मुंबई: सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सुरू आहे. बाप्पांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान विविध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान, शिल्पा शेट्टीपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्व सेलिब्रिटींनी आपापल्या घरी गणपतीचे स्वागत केले. दरम्यान सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खाननेही बाप्पाचे (Sara Ali Khan Ganesh Chaturthi Pooja) स्वागत केले. साराने बाप्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्यासह तिची आई अमृताही दिसते आहे. पण ट्रोल आर्मीने या पोस्टवरुनही तिच्यावर टीका केली आहे.

हे वाचा-बाप्पा निघाले गावाला, रडू आवरेना परीला; छोट्या मायराचा हा गोड Video पाहिला का?

सारा अली खानने गणेश चतुर्थीच्या दिवशी (Ganesh Chaturthi) इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. यामध्ये अमृता आणि सारा बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. साराने कॅप्शनमध्ये लिहिले – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आता काही ट्रोलर्सनी या फोटोंवरुन साराला लक्ष्य केले आहे.

हे वाचा-ब्रह्मास्त्र प्रमोशनदरम्यान चर्चा आलियाच्या शराराचीच! बाळासाठी ड्रेसवर लिहिला खास संदेश

अनेकांनी अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत की तिला लाज वाटली पाहिजे की मुस्लिम असूनही ती या गोष्टी करते आहे. एका युजरने अशीही कमेंट केली आहे की, साराने पैशासाठी तिचा धर्मही विकला. अशाप्रकारे अत्यंत असभ्य भाषेतील कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.

Sara ali khan comments

दरम्यान अनेक यूजर्स साराला पाठिंबाही देताना दिसत आहेत. ती समाजात एक चांगला संदेश देत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, ट्रोलर्सच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. एवढेच नाही तर अभिनेत्रीच्या पोस्ट पोस्टवर तिचे चाहते आणि ट्रोलर्स एकमेकांशी भांडतानाही दिसत आहेत.


महादेवाची भक्त आहे सारा अली खान

याआधीही अनेकदा सारा धार्मिक कारणामुळे ट्रोल झाली आहे. केदारनाथमधील फोटो शेअर केल्यामुळेही तिच्यावर टीका झाली होती. सारा अनेकदा तीर्थक्षेत्रांना भेट देते. ती महादेवाचीही मोठी भक्त आहे. ती अनेकदा महाकाल आणि केदारनाथला जाते. साराने अनेकवेळा सांगितले आहे की, ती कोणत्या एका धर्म किंवा जातीवर विश्वास ठेवत नाही. एका सारा म्हणाली होती की, तिला जिथे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, तिथे ती पोहोचते. मग ते गुरुद्वारा असो किंवा मंदिर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here