मुंबई: मुंबईत सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) धूम आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरात त्याच्या आकर्षक आणि विविध समाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी (Decorations) ओळखले जातात. राज्याच्या विविध भागांमधून लोक मुंबईतील गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी येत असतात. असाच एक देखावा सध्या मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवातील हा अनोखा असा देखावा साकारला आहे फ्रँकलीन पॉल (Artist Franklin Paul) या कलाकाराने. हा देखावा केवळ कलात्मक देखावा नसून त्यातून कलाकाराने मोठा संदेश दिला आहे. तो देखावा आहे देशभरातील कर्करोग्यांचे आशास्थान, लाखो कर्करोगाच्या रुग्णांना जीवनदान देणाऱ्या, जगण्याची नवी उभारी देणाऱ्या परळमधील टाटा मेमेरियल रुग्णालयाचा (Tata Memorial Hospital). या देखाव्याच्या निमित्ताने मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या (Tata Cancer Hospital) आरोग्यसेवेचा उत्तुंग वारसा अधोरेखित झाला आहे. (decoration of tata cancer hospital has been set up in mumbai ganeshotsav)

टाटा कॅन्सर रुग्णालय दाखवते मृत्यूवर मात करण्याचा मार्ग

कर्करोग म्हणजे मृत्यूचे द्वार असाच समज समाजात रुढ आहे. एखाद्याला हा आजार झाल्यास तो जगण्याची उमेदच हरवून बसतो. त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. रुग्णासह संपूर्ण कुटुंब तुटून जाते, त्यांची आर्थिक कोंडी होते. मात्र, अशा लोकांच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करत जगण्याची नवी दिशा देण्याचे काम परळच्या या टाटा मेमोरियन रुग्णालयाने केले आहे. म्हणूनच हा देखावा संवेदनशील माणसाला असहाय माणसांनी मृत्यूवर कसा विजय मिळवला याचा साक्षीदार असल्याचे स्पष्ट करतो. या रुग्णालयाचे हेच मोठेपण फ्रँकलीन पॉल यांच्या देखाव्यातून साकार झाले आहे.

decoration of tata cancer hospital has been set up in mumbai ganeshotsav

कलाकार फ्रँकलीन पॉल यांनी गणेशोत्सवात साकारला टाटा कॅन्सर रुग्णालयाचा देखावा

परळ येथील कर्करोगावर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे जगातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक गणले जाते. येथे कर्करोगाचा प्रतिबंध कसा घालता येईल, तसेच कर्करोगावर आधिनिक उपचार करणे आणि कर्करोगावर संशोधन करणे असे तिहेरी काम या टाटा मेमोरियल रुग्णालयामार्फत केले जाते, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. या टाटा मेमोरियल रुग्णालयात वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमार ७० हजार रुग्ण उपचार घेत असतात. या ७० हजार रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील तर ६० टक्के रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमधील असतात. विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे ७० टक्के रुग्णांना येथे जवळ जवळ मोफत किंवा अल्पदरात उपचार केले जातात.

पाहा : राज्यातील सर्वात उंच ३८ फूट गणराय मुंबईच्या गिरगावात, उंचच-उंच बाप्पांची महाराष्ट्रभर चर्चा

कर्करोग हा दुर्धर आजार आहे. या रोगावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्या तुलनेने टाटा रुग्णालयात कर्करोगावर उत्तमातील उत्तम उपचार अतिशय कमी खर्चाच उपलब्ध होतात. विशेष म्हणजे येथे कर्करोगावरील सर्व प्रकारचे उपचार एकाच छताखाली मिळत असल्याने रुग्णांना वणवण फिरावे लागत नाही. टाटा रुग्णालयाची सेवा पाहून येथे येणाऱ्या रुग्णांशी असंख्य सेवाभावी संस्था देखील जोडल्या गेल्या आहेत.

२८ फेब्रुवारी १९४१ ला सुरू झाले रुग्णालय

सर दोराबजी टाटा ट्रस्टने २८ फेब्रुवारी १९४१ रोजी परळमधील टाटा मेमोरियल रुग्णालय सुरू केले. त्यानंतर सन १९५७ मध्ये ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आले. त्यानंतर पुढे १९६२ मध्ये या रुग्णालयाचे प्रसासकीय नियंत्रण केंद्राच्या अणुऊर्जा विभागाकडे देण्यात आले. तेव्हापासून हे रुग्णालय अविरतपणे आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक उपचार देत आहे.

वाचा- हवेत उडणारी बस, रोपवे कार, टोलनाके कायमचे बंद, ‘उडत्या’ घोषणांनी गडकरी चर्चेत

अशी झाली रुग्णालयाची उभारणी

सन १९३२ मध्ये जमशेदजी टाटा यांच्या सून मेहरबाई टाटा यांचा रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या हातून मानवसेवा व्हावी या उद्देशाने त्यांचे पती दोराबजी टाटा यांनी कर्करोगासाठीचे रुग्णालय भारतात उभारण्याचा संकल्प केला. दोराबजी यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी नौरोजी सकलतवाला यांनी रुग्णालय उभारणीचे स्वप्न पुढे नेले. शेवटी जेआरडी टाटा यांच्या प्रयत्नांनी २८ फेब्रुवारी १९४१ रोजी मुंबईत कामगार वस्ती असलेल्या परळमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. तेव्हा पासून गेली ८ दशके हे रुग्णालय दुर्धर आजाराने ग्रस्त झालेल्या सर्वसामान्य रुग्णांची सेवा करत आहे. या रुग्णालयाने देशात एक आदर्श उभा केला आहे.

वाचा- अखेर ‘त्या’ देखाव्याला सुधारित परवानगी; ५ सप्टेंबरला पुन्हा होणार सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here