Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील करवीर (Karvir) तालुक्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसानं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तासभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं ओढे-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. काही ठिकाणी ओढ्याच्या वर पाणी आल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे. नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. जुलैमध्ये जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील पंचगंगा नदी, भोगावती नदी, कासारी नदी, वारणा नदी, दूधगंगा नदीला पूर आले होते. मात्र, पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. यामुळं उकाड्यापासून मुंबईकरांना दिलसा मिळाला आहे. मुंबईत रात्री पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावासाचा जोर वाढला आहे. दरम्यान, आजही मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. कुर्ला-अंधेरी रोडवरील काजूपारा इथेही रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला. 

मुंबईसह राज्यातील इतरही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही काल दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here