औरंगाबाद : विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या त्रासामुळे औरंगाबादमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर, असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) या तरुणाचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र त्याचे गावातील दुसऱ्या एका महिलेशीही प्रेमसंबंध होते. गणेशच्या लग्नाला काही वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण सुरूच होते. तसंच सदर प्रेयसीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता.

मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले, रेल्वे थेट शेतात घुसली, अपघाताचा LIVE VIDEO

‘तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,’ असं गणेशची प्रेयसी त्याला वारंवार सांगत असे. त्यामुळे मानिसक तणावात आलेल्या गणेश मुसळे याने अखेर स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या प्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here