अजित पवारांच्या कामाशी तुलना
शिंदे गट आणि भाजपच्या सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्या कामाशी तुलना केली आहे. ‘शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन अडीच महिने झाले. मात्र अजून एकही पालकमंत्री नेमलेला नाही. आपल्याला आठवत असेल तर महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मॅरेथॉन बैठका घायचे. गेल्या अडीच वर्षात कोव्हिड किंवा अन्य कुठलीही परिस्थिती असताना कोणतंही काम अडलं नाही,’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ncp supriya sule, टीव्हीवर कधीही बघितलं तरी ते कोणाच्या तरी घरीच असतात; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा – ncp mp supriya sule criticizes cm eknath shinde and bjp state government
पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विविध नेत्यांच्या घरी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेत आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ‘आम्हीही गणपतीचं दर्शन घेतो, मात्र त्यासाठी कॅमेऱ्यावाल्यांना सोबत नेत नाहीत. आताचे मुख्यमंत्री हे शोमॅन आहेत,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.