पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात (Cyrus Mistry Accident) मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ घडलेल्या भीषण अपघात मिस्त्री यांनी जीव गमावला. साधारण ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी वापी येथे नेलं असल्याची माहिती आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.