tata group former chairman | सायरस मिस्त्री यांचा पालघरनजीक झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने उद्योग वर्तुळावर शोककळा पसरली आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून शोकाकुल प्रतिक्रिया उमटत आहेत. सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. याच वादातून २०१६ साली सायरस मिस्त्री यांना पायउतार व्हावे लागले होते.

हायलाइट्स:
- सायरस मिस्त्री यांना या सगळ्याची चाहुल आधीच लागली होती
- सायरस मिस्त्री यांनी आपल्या पत्नीला मेसेज करुन तशी कल्पना दिली होती
- २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले
सायरस मिस्त्री यांना या सगळ्याची चाहुल आधीच लागली होती. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून गच्छंती होण्यापूर्वी सायरस मिस्त्री यांनी आपल्या पत्नीला मेसेज करुन तशी कल्पना दिली होती. मिस्त्रींसोबत काम करणारे कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य निर्मलय कुमार यांनी आपल्या ब्लॉगमधून ही माहिती दिली होती. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात येणार होते. दुपारी दोन वाजता टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीपूर्वीच सायरस मिस्त्री यांना सगळ्या परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यामुळे सायरस मिस्त्री यांनी आपल्या पत्नीला मेसेज करुन म्हटले की, ‘ मला नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे’.
मिस्त्री यांचा कंपनीसोबतचा करार ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार होता. त्याआधीच त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. मात्र, सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात धाव घेत या निर्णयाविरोधात शेवटपर्यंत लढा दिला होता. परंतु, पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.