Car accident Palghar | सायरस मिस्त्री हे अन्य तीन व्यक्तींसह गुजरातहून मुंबईकडे येत होते. मिस्त्री हे आपल्या कारने अन्य तीन मित्रांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत असताना पालघरजवळ कारला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार नदीच्या पुलाला जाऊन धडकली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला.

 

Cyrus Mistry Car
सायरस मिस्त्री कार

हायलाइट्स:

  • अपघात घडल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी लोकांनी घटनास्थळी गर्दी केली
  • कारच्या बोनेटचा अर्धा भाग चक्काचुर झाला आहे
  • सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर दिनशा पंडोले यांचा जागीच मृत्यू
मुंबई: शापुरजी पालनजी उद्योगसमूहाचे वारसदार आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष शापुरजी पालनजी यांचा रविवारी पालघरनजीक झालेल्या भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला. येथील सूर्या नदीवरील पूलावरील दुभाजकावर त्यांची मर्सिडीज कार जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या बोनेटचा अर्धा भाग चक्काचुर झाला आहे. एवढेच नव्हे तर मर्सिडीज कारचे इंजिन हे थेट चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या पायापर्यंत आले होते. इंजिन धडकेने इतक्या आतवर घुसले यावरुन ही धडक किती जोरदार असेल, याचा अंदाज येऊ शकतो.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील सूर्या नदीच्या पुलावर साधारणतः दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मर्सिडीज गाडीचा (MH 47 AB 6705) दुभाजकाला आदळून भीषण अपघात घडला. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर दिनशा पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर या गाडीची चालक महिला अनहिता पंडोले आणि डेरियस पंडोले हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोघांना सुरुवातीला कासा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले .मात्र त्यांना पुढील उपचारासाठी गुजरात मधील वापी येथील रॅम्बो रुग्णालयात हलविण्यात आले.
Sharad Pawar: आमच्यात जनरेशन गॅप असल्याने सायरस मिस्त्रींना तेव्हा फार भेटलो नाही, पण…
प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितला अपघाताचा थरारक प्रसंग

चारोटी गावाच्या परिसरातील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने हा अपघात कसा घडला, याबद्दल माहिती दिली. सायरस मिस्त्री यांची कार एक महिला चालवत होती. ही कार डाव्या बाजुने अन्य एका कारला ओव्हरटेक करत होती. याचवेळी पुलावर असणाऱ्या दुभाजकाला ही कार धडकली. अपघात घडल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
Cyrus Mistry: फडणवीसांच्या ‘त्या’ आदेशानंतर सायरस मिस्त्रींचा मृतदेह मुंबईत आणणार, जे.जे रुग्णालयात पोस्टमार्टेम?
सायरस मिस्त्री यांची कार कोण चालवतं होतं?

हा अपघात झाला तेव्हा अनहिता पंडोले या सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार चालवत होत्या. अनहिता पंडोले या मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अपघातानंतर कारमधील एअर बॅग्ज उघडल्यामुळे अनहिता पंडोले (५५) आणि त्यांच्या बाजूला बसलेले डेरियस पंडोले (६०) बचावले. मात्र, या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here