कृष्णा अहिरे हा मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आज रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याने राजमालती नगरातील समृद्धी अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, कृष्णा अहिरे यांनी आत्महत्या केली नसून त्याचा घातपात केल्याचा आरोप त्याचे वडील सुधीर अहिरे यांनी केला आहे. या वरून जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. मयत कृष्णा अहिरे याच्या पश्चात वडील सुधीर अहिरे, आई अनिता अहिरे आणि भाऊ चेतन अहिरे असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात होता संशयित
मयत कृष्णा अहिरे याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दुचाकी चोरीतील तो संशयित होता. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत. या गुन्ह्यात त्याला अल्पवयीन असल्याने त्याचे नाव गोपनिय ठेवण्यात आले होते.
२१ सप्टेंबर रोजी वाढदिवस, होणार होता १८ वर्षाचा पूर्ण
२१ सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला तो १८ वर्षाचा पूर्ण होणार होता. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी चोरी प्रकरणात असलेले बंटी कोळी नामक मुलासह इतर चार ते पाच जण कृष्णा अहिरेच्या घरी आले होते. त्यावेळी कृष्णा अहिरे याला दुचाकीच्या पैश्यांवरून बोलाबोल झाल्याची माहिती मयत कृष्णाचा भाऊ चेतन अहिरे याने दिली असून कृष्णसोबत घातपात झाल्याचा आरोप केला आहे.