विराटची महिला चाहतीचा फोटो व्हायरल
आशिया चषकाचा सुपर-४ सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी केली. या सामन्यातील एका महिला चाहतीचा फोटो व्हायरल होत आहे. तिच्या हातात एक पोस्टर आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, ‘मी कोहलीसाठी येथे आलेली आहे’. विराट जेव्हा क्रिजवर फलंदाजीसाठी आला तेव्हा ती महिला पोस्टर दाखवताना दिसली.
विराटने ६० धावा केल्या
या सामन्यात विराट कोहलीने ६० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट शेवटच्या षटकात बाद झाला. ४४ चेंडूंच्या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. भारतीय संघाची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि दीपक हुडा यांनी कोणतीही मोठी खेळी खेळली नाही. पण विराटने एक टोक राखून संघाला १८१ धवा मिळवून दिल्या.
एक चेंडू बाकी असताना भारताचा पराभव
पाकिस्तानने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. सलामीवीर मोहम्मद रिझवानने ७१ धावा केल्या. मात्र, मोहम्मद नवाजने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी कमाल केली. यापूर्वी त्याने गोलंदाजीत ४ षटकात केवळ २५ धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने २० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावा फटकावल्या. आता टीम इंडियाचा सुपर-४ च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेशी सामना होणार आहे.