मुंबई : नवी दिल्लीतील नोएडा इथला ट्विन टॉवर गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आला होता. या टॉवरची उभारणी करताना कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळेच २८ ऑगस्ट रोजी हे दोन्ही टॉवर्स कंट्रोल ब्लास्टिंगच्या मदतीनं उद्धवस्त करण्यात आले. हे टॉवर उद्धवस्त झाल्यानं अनेकांची स्वप्नही धुळीस मिळाली आहेत. त्यातील एका टॉवरमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मधील अभिनेता मनित जौरा याचंही घर होतं. परंतु त्याचीही सारी स्वप्नं उद्धवस्त झाली आहेत.

नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्समध्ये ‘कुंडली भाग्य’ मालिकेत ऋषभ लुथराची भूमिका साकारणाऱ्या मनित जौराची एक नाही तर दोन घरं होती. याबाबत ‘ई टाइम्स’शी बोलताना मनितनं सांगितलं की, ‘माझ्या वडिलांनी ट्विन टॉवर्समध्ये दोन फ्लॅट घेतले होते, एपेक्स आणि सायने. त्यांनी माझ्यासाठी गुंतवणूक म्हणून एक फ्लॅट २०११ मध्ये आणि दुसरा २०१३ मध्ये घेतला.’

ते दु:ख मनात ठेवूनच आज मी हसतोय, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत

तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा आम्ही हे फ्लॅट विकत घेतले तेव्हा टॉवर्सची उभारणी करताना परवानगी घेण्यात आलेली नाही, बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्यानंही आम्हाला काहीही सांगितलं नाही. जेव्हा आम्हाला त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही एका प्रख्यात वकिलाची नियुक्ती केली. कारण आम्हाला आमचे पैसे परत हवे होते. यासाठी माझ्या वडिलांनी अनेक वर्ष कोर्टकचेऱ्या केल्या. या खटल्यामुळे त्यांना या वयात खूप काही सहन करावं लागल्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे.’


मनितनं पुढं सांगितलं की, ‘आपल्या देशात घर म्हणजे केवळ फ्लॅट नसून त्यात आपल्या भावना देखील गुंतलेल्या असतात. माझ्या वडिलांनी एका चांगल्या ठिकाणी चांगलं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु तसं काहीच झालं नाही.’ त्यानं पुढं सांगितलं की, ‘ कोर्टानं बांधकाम व्यावसायिकांनी खरेदीदारांना दिलेल्या रकमेवर व्याज द्यावं लागेल, असा निकाल दिला होता. परंतु त्या व्यावसायिकानं आम्हाला फक्त काही महिनेच व्याजाची रक्कम दिली. तेव्हाच आम्ही दुसरी केस दाखल केली.’

‘त्यानंतर, पुन्हा त्यांनी आम्हाला काही महिन्यांनी थोड्या प्रमाणात पैसे द्यायला सुरुवात केली, पण त्याचा फायदा झाला नाही. कारण आम्ही घर खरेदी करताना जी रक्कम भरली होती ती आणि बांधकाम व्यावसायिकाकडून मिळालेली रक्कम यात खूप तफावत आहे. मी त्यात अजिबातच समाधानी नाही. परंतु आता जेल काही झालं ते झालं. त्यातून आम्ही हळूहळू सावरत आहोत आणि आयुष्य पुढं जगत आहोत.’ अभिनेता म्हणाला.

मनित जौरा

मनितनं म्हणाला, ‘जे काही झालं ते माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक वाईट स्वप्नं होतं. माझ्या वडिलांना न्यायालयात निकाल आपल्या बाजूनं लागेल या आशेनं बसलेलं मी पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या प्रकरणाचा योग्य निकाल लावत न्यायालयानं आपल्या देशातील इतर लोक आणि बांधकाम व्यावसायिकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.’

सोहेल खानसोबतचा २४ वर्षांचा संसार का मोडला? अखेर सीमा सजदेहनं सोडलं मौन

मुंबई एअरपोर्टवर अभिनेता विकी कौशल स्पाॅट, चाहत्यांसोबत गप्पा आणि सेल्फीज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here