ind vs pak asia cup: मधल्या फळीतील फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्मा संतापला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत १२ चेंडूंमध्ये १४ धावा करून ड्रेसिंग रुममध्ये परतला. त्यावेळी रोहितनं पंतला चांगलंच सुनावलं.

झेलबाद होऊन पंत माघारी परतला. ड्रेसिंग रुममध्ये जाताच रोहित शर्मानं त्याला चांगलंच फटकारलं. विशेष म्हणजे याचवेळी कॅमेरामननं ड्रेसिंग रुमकडे कॅमेरा वळवला. पंत आणि रोहितच्या देहबोलीवरून त्यांच्यातील संवादाची कल्पना क्रिकेट रसिकांना आली. पंत रोहितला काहीतरी समजावू पाहत होता. त्यासाठी तो हावभाव करत होता.
ऋषभ पंत काल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पंत फलंदाजीस उतरला, त्यावेळी हार्दिक पांड्या रोहित शर्माशी सतत बोलत होता. पांड्याला पंतच्या जागी फलंदाजी करायची होती, असं त्याच्या देहबोली आणि हावभावांवरून वाटत होतं. त्यावर रोहित शर्मानं उत्तर दिल्यावर पांड्यानं हात जोडले. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. तो माघारी परतल्यावर रोहित पंतप्रमाणेच त्याच्याशीही बोलला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.