मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. किंबहुना चर्चेत राहण्यासाठी ती काही ना काही वक्तव्य करत असते. आता तिनं महेश भट्ट यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की महेश भट्ट यांचं मूळ नाव आहे अस्लम.

कंगनानं इन्स्टा स्टोरीत शेअर केला व्हिडिओ

अभिनेत्री कंगना म्हणते, महेश भट्ट यांचं खरं नाव आहे अस्लम. ते त्यांनी वापरावं. धर्मांतर केलेलं नाव कशाला वापरता? हे नाव सुंदर आहे. पुढे ती लिहिते. महेश भट्ट हिंसाचार घडवण्यासाठी लोकांना भडकवतायत. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

माझी सर्व स्वप्नंही धुळीस मिळाली! छोट्या पडद्यावरील अभिनेत्याची ट्विन टॉवरमध्ये होती घरं

नाव बदलल्याचं कंगनानं सांगितलं कारण
कंगना हेही लिहिते की, महेश भट्ट यांनी सोनी राजदानशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदललाय. अस्लम हे इतकं चांगलं नाव असताना, ते बदलायचं कशाला? एक क्लिप शेअर करत ती लिहिते, यांनी आपलं खरं नाव वापरावं. यांनी धर्मांतर केलं आहे, हे जगापुढे आणावं.

कंगना स्टोरी

ते दु:ख मनात ठेवूनच आज मी हसतोय, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत

गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री एका ‘सुपरहिट’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. या दरम्यान अभिनेत्रीच्या एका नव्या सिनेमाची पहिली झलक समोर आली असून यामधून तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बॉलिवूडची क्वीन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. ‘इमर्जन्सी’ (Emergency Teaser Out) या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार असून या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती अभिनेत्री कंगना रणौतची आहे. स्क्रीनप्ले आणि संवाद लेखन रितेश शाह यांचं आहे.

लिटल चॅम्प सेटच्या बाहेर भारती आपल्या लक्षसोबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here