मुंबई : मालिका टीआरपी रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. प्रेक्षकांना त्यातलं नाट्य आवडतं. अनेक जणांना ते आपल्या आजूबाजूला घडतंय असं वाटतं. इतके ते त्यात गुंतत जातात. अनिशसोबत यश, ईशा, गौरी फिरायला गेले हे ऐकल्यावर अनिरुद्ध संतापतो. खरं तर त्यामागचं कारण म्हणजे आशुतोषच्या घरातल्यांशी अजिबात संपर्क नको, हे आहे.

आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात मुलं फिरून घरी येतात. अनिरुद्ध ईशावर भडकतो. तो म्हणतो, अनिश तुझ्या आजूबाजूलाही फिरकायला नको मला. त्यानंतर ईशाला मुलांपासून आलेल्या वाईट अनुभवाबद्दलही तो आठवण काढतो. त्यावर यश म्हणतो, सगळे काही एकसारखे नसतात. आई नाही असा विचार करत. तसं असतं तर आईनं आशुतोषशी मैत्री नसती केली.

हे ऐकल्यावर घरातले सगळे अवाक होतातच. कारण यशनं थेट अनिरुद्धला चपराक मारली असते. म्हणजे अनिरुद्ध अरुंधतीशी वाईट वागला, म्हणून आशुतोषही तसाच असणार हा विचार तिनं नाही केला. आता यावर अनिरुद्ध काय म्हणतो, हे आगामी भागात समोर येईलच.

याआधी अनिरुद्ध रागानं अरुंधतीला फोन लावतो. ती गडबडीत असल्यानं नेमका आशुतोष तो उचलतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, इतक्या गोष्टी पुढे गेल्यात का आता. अरुंधतीचा फोनही तुमच्याकडे असतो का? मग अरुंधती फोन घेऊन म्हणते बोला. अनिरुद्ध तिला विचारतो, मुलं त्या अनिशबरोबर का गेलेत? त्यावर अरुंधती खडसावते, ते मला माहीत नाही आणि माहीत असतं तरी ते तुम्हाला सांगितलं नसतं. अरुंधतीतला हा बदल आशुतोष बघतच राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here