cyrus mistry death: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबईजवळ रस्ते अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री कारमधून अहमदाबादहून मुंबईला येत होते. या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ब्लाईंड स्पॉट्स पुन्हा चर्चेत आले आहेत.

आपण प्रवास करताना काही ठिकाणं नीट पाहू शकत नाही. त्या ठिकाणांना ब्लाईंड स्पॉट्स म्हटलं जातं. सुरक्षेच्या दृष्टीनं ही ठिकाणं अतिशय महत्त्वाची असतात. मिस्त्री यांच्या कारला अपघात होण्यामागे वेग हे महत्त्वाचं कारण असल्याचं पाटील म्हणाले. भरधाव वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा अपघात झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ऑगस्टमध्ये म्हणजेच गेल्याच महिन्यात ब्लाईंड स्पॉटचा उल्लेख केला होता. देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होतो. डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट्समध्ये (डीपीआर) होणाऱ्या चुका रस्ते अपघातांना प्रामुख्यानं जबाबदार आहेत. डीपीआर तयार करताना गुणवत्तेशी संबंधित बदल करण्याची गरज आहेत. ब्लाईंड स्पॉट्सवर विशेष लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे, असं गडकरी म्हणाले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.