Tata Sons Chairman | सायरस मिस्त्री हे टाटा सन्सला व्यावसायिक चेहरा देण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे त्यांच्या काळात समूहातील अंतर्गत राजकारण उफाळून आले. रतन टाटा यांनी दीर्घकाळ टाटा सन्सचे अध्यक्षपद भुषविले. सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ३ मार्च २०१२ रोजी टाटा जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक कर्मचाऱ्याशी हस्तांदोलन केले होते.

 

Cyrus Mistry (2)
सायरस मिस्त्री

हायलाइट्स:

  • जमशेदपूरच्या सर्किट हाऊस परिसरात लोकांनी एकच गर्दी केली होती
  • विमलेंद्र झा हे नेदरलँडसमध्ये होते
मुंबई: देशातील तरुण उद्योजकांपैकी एक असलेल्या सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघरनजीक झालेल्या भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला होता. २०१२ ते २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्षपद भुषविलेल्या सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी अल्पावधीत आपल्या नेतृत्त्वाची छाप पाडली होती. सायरस मिस्त्री हे सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये सहजपणे मिसळायचे. ते आपल्या कर्मचाऱ्यांची किती काळजी घेत याचा प्रत्यय जानेवरी २०१३ मध्ये आला होता. त्यावेळी टाटा स्टील (Tata Steel) कंपनीचे युरोपमधील कार्यकारी संचालक विमलेंद्र झा यांच्या १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केली होती. त्यावेळी विमलेंद्र झा हे नेदरलँडसमध्ये होते. विमलेंद्र झा यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर जमशेदपूरच्या सर्किट हाऊस परिसरात लोकांनी एकच गर्दी केली होती. हे वृत्त सायरस मिस्त्री यांना समजले तेव्हा ते स्वत: जमशेदपूरला गेले आणि त्यांनी विमलेंद्र झा यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. सायरस यांची ही कृती चर्चेचा विषय ठरली होती.
एक लहानशी चूक सायरस मिस्त्रींच्या जीवावर बेतली? अन्यथा जीव वाचू शकला असता
सायरस मिस्त्री हे टाटा जयंतीच्या कामासाठी जमशेदपूरला यायचे तेव्हा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विचारपूस करायचे. रतन टाटा यांनी दीर्घकाळ टाटा सन्सचे अध्यक्षपद भुषविले. त्यांच्या अवतीभोवती नेहमी सुरक्षारक्षकांचा गराडा असायचा. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांना रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचता येत नसे. याउलट सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर टाटा जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात प्रत्येक कर्मचाऱ्याशी हस्तांदोलन करायचे. त्यांची कर्मचाऱ्यांची विचारपूस करायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला होता. याशिवाय, सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्येष्ठांऐवजी तरुण कर्मचाऱ्यांना संधी देण्यास सुरुवात केली होती. संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये आणि निर्णयप्रक्रियेत मिस्त्री यांनी तरुण रक्ताला अधिक वाव देण्यास सुरुवात केली. हीच गोष्ट अनेक कंपनीतील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांना खटकत होती.
Cyrus Mistry यांची कार इतक्या जोरात धडकली की, इंजिन चालकाच्या पायापर्यंत आत घुसलं

सायरस मिस्त्री आयरिश नागरिक

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री हे पारशी कुटुंबातील होते. मात्र, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे भिन्न होती. सायरस मिस्त्री हे तांत्रिकदृष्ट्या आयरिश नागरिक होते. कारण त्यांच्या आईचा जन्म आयर्लंडमध्ये झाला होता. टाटा सन्समध्ये कार्यरत असताना त्यांनी मध्यंतरी आपले राष्ट्रीयत्त्व बदलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आवश्यक सोपस्कार पूर्ण न होऊ शकल्यामुळे सायरस मिस्त्री यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकले नव्हते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here