तिरुअनंतपुरम : केरळच्या माजी आरोग्य मंत्री के.के. शैलजा करोना काळात देशभरात चर्चेत आल्या होत्या. केरळ एकाचवेळी करोना आणि निपाह संसर्गाशी लढा देत होता. मात्र, आरोग्यमंत्री म्हणून शैलजा यांनी उत्तम काम करत केरळमधील संसर्ग नियंत्रणात आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. या कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा ६४वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर होणार होता. मात्र, त्यांही हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

के.के.शैलेजा यांनी सांगितलं की, नोबेल पुरस्काराची नोबेल पुरस्काराची आशियाई आवृत्ती मानला जाणारा मॅगसेसे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय पक्षाशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे. मला पुरस्कार समितीने कळवले की पुरस्कारासाठी माझा विचार केला जात आहे. पण मी एक राजकीय नेता आहे. हा पुरस्कार सहसा राजकीय नेत्यांना दिला जात नाही, असंही शैलजा म्हणाल्या.

मुलीने आत्महत्या केल्यानंतर टाटा स्टीलच्या ‘त्या’ अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांसाठी धावून गेले होते सायरस मिस्त्री
मी माझ्या पक्षनेतृत्वाशी यावर चर्चा केली आणि आम्ही एकत्रितपणे हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा एक मोठा पुरस्कार आहे. पण पुरस्कार देणारी एनजीओ असून ही एनजीओ कम्युनिस्टांच्या तत्वांचे समर्थन करत नसल्याचंही शैलजा यांनी म्हटलं.

१९५७ मध्ये स्थापित, रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च सन्मान आहे. हे तिसऱ्या फिलीपीन राष्ट्रपतींच्या स्मृतीप्रित्यार्थ देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी आशियातील व्यक्ती आणि संस्थांना विवध क्षेत्रात समाजाची निस्वार्थ सेवा केल्याबद्दल दिला जातो.

पाकिस्तानकडून जिव्हारी लागणारा पराभव, तरी रोहित शर्मा आनंदी? स्वत: केला खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here