नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याचे समर्थन केले आहे. पेन्शन नियामकाने म्हटले की देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या पाहता आगामी काळात पेन्शन फंडावर दबाव वाढेल.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार ईपीएफओने म्हटले की, निवृत्तीचे वय वाढवल्याने कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे चांगले लाभ देताना पेन्शन प्रणालीवरील भार कमी होईल. संस्थेच्या अहवालानुसार २०४७ पर्यंत भारतात ६० वर्षांवरील लोकांची संख्या १४ कोटींहून अधिक होईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे पेन्शन फंडावरील दबाव लक्षणीयरीत्या वाढेल. ईपीएफओने म्हटले आहे की, निवृत्तीचे वय वाढवण्याची बाब इतर देशांच्या नियमांचा अभ्यास केल्यानंतर बोलले जात आहे.

PPF खात्यातून पैसे काढण्याचे नियम तुम्हाला माहित्येय, कर लाभ घेण्यासाठी करा ‘हे’ उपाय!
पेन्शन प्राधिकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सेवानिवृत्तीचे वय जितके जास्त असेल तितके कर्मचारी पेन्शन फंडात अधिक रक्कम जमा करतील आणि त्याला अधिक चांगले लाभ दिले जाऊ शकतात. यामुळे महागाईवर मात करून मोठा निवृत्ती निधी उभारण्यासही मदत होईल. ईपीएफओचे सध्या सुमारे ६ कोटी सदस्य आहेत आणि एकूण १२ लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन ते करते.

पेन्शनधारकांना Aadhaar शी संबंधित मिळतात ३ प्रमुख लाभ, जाणून घ्या
त्याचे नुकसान काय होईल
दरम्यान निवृत्तीचे वय वाढवून वृद्ध कामगारांच्या कुटुंबांना अधिक दिवस नियमित उत्पन्न मिळेल. यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांना मोठा निधी मिळण्याची शक्यता वाढेल. मात्र, त्याची दुसरी बाजू देखील धोकादायक आहे. निवृत्तीचे वय वाढल्यानंतर तरुणांना नोकरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटले की २०३१ पर्यंत भारतात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या १९४ दशलक्षांपर्यंत पोहोचेल, जी २०२१ मध्ये केवळ १३८ दशलक्ष होती. अशाप्रकारे एका दशकात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४१ टक्क्यांनी वाढणार आहे. २०२१ च्या लोकसंख्येनुसार २०२१ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३.४ कोटींनी वाढली आहे.

कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पेन्शन कसे मिळवायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे
सध्या निवृत्तीची वय मर्यादा किती
भारतात सध्या कमाल निवृत्तीचे वय ५८ ते ६५ वर्षे आहे. ही तफावत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांपासून ते सरकारी क्षेत्रापर्यंत आहे. तसेच जर आपण युरोपियन युनियनबद्दल बोललो, तर तेथे निवृत्तीचे सरासरी वय ६५ वर्षे आहे. युरोपमध्ये डेन्मार्क, इटली आणि ग्रीसमध्ये निवृत्तीचे वय ६७ वर्षे आहे, तर अमेरिकेत ६६ वर्षे आहे. ईपीएफओने या वर्षी जूनमध्ये १८.३६ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत, जे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ४३ टक्क्यांनी अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here