artist playing role of hanuman dies: गणेशोत्सव मंडळातील कार्यक्रमात कला सादर करताना एका तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी तिथे शेकडो लोक उपस्थित होते. हनुमानाची भूमिका साकारणारा कलाकार अचानक मंचावर कोसळला. तो अभिनय करत असल्याचं उपस्थित प्रेक्षकांना वाटलं. मात्र थोड्याच वेळात त्याच्या शरीराची हालचाल थांबली.

नाचता नाचता रवी शर्मा अचानक मंचावर कोसळला. त्यावेळी सगळेच भजनात दंग होते. रवी अभिनय करत असावा असा अनेकांचा समज झाला. त्यामुळे भजन सुरूच राहिलं. मात्र काही वेळ तो उठलाच नाही. त्याच्या शरीराची हालचालही होत नव्हती. त्यामुळे लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो उठला नाही. त्याला मैनपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.