Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 5, 2022, 3:41 PM
Maharashtra Politics news | अजित पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला होता. गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. पण याआधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. पण सध्या जावे लागते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो. मात्र, मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

हायलाइट्स:
- अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना ‘शो मॅन’ म्हणत त्यांना चिमटा काढला होता
- पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले
- आपण बोलू नका, थोडी सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून टीका करा
‘आपण बोलू नका, थोडी सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून टीका करा. आपण कोणावर टीका करतो याचं भान ठेवावं अन्यथा महाराष्ट्रात हाहाकार माजेल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. तेव्हा अजितदादांवर बोलताना थोड आचपेच ठेवून बोला.” अजितदादांवर बोलण्यासाठी तुमच्या पप्पांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगा. बच्चू ये तेरे बस की बात नाही, असे म्हणत रुपाली पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे आता या टीकेला श्रीकांत शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
‘बाप्पाच्या दर्शनाला आम्हीही जातो, पण कॅमेरा घेऊन नाही’
अजित पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला होता. गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. पण याआधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. पण सध्या जावं लागतं… आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राज कपूर शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.