रत्नागिरीः जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून संततधार पडणाऱ्या पावसामुळे देवरुख, संगमेश्वरला झोडपले असून तिथं पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात चोवीस तासांत ३७.८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुपारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने संगमेश्वरमधील शास्त्री आणि सोनवी नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळं एका घरातील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदारांनी केल्या आहेत. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

पावसाचा पहिला तडाखा वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसामुळं रस्त्यावर पाणी साचले आहे. देवरुख- संगमेश्वर मार्ग पाण्याखाली गेला असून संगमेश्वर बाजारपेठेवर पुराचं संकट आहे.

वाचाः

मोसमी पावसानं नऊ जूनला कोकणात धडक दिली. त्यानंतर पुढील सहा दिवस उन – पाऊस अशी स्थिती होती. मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली होती. त्यानुसार दुपारपासूनच मुसळधार पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. संगमेश्वर व देवरुख तालुक्यात अजूनही पावसाचा जोर ओसरला नाहीये.

वाचाः

दरम्यान, कोल्हापूर शहरातही सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं राजाराम आणि शिंगणापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्या प्रशासनानं नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here