कोल्हापूर : शहरात आज ५ दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. यासाठी महापालिकेने अनोखी व्यवस्था केली असून इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारलं आहे. यंत्राद्वारे गणेश मूर्ती पाण्यात सोडल्या जात आहेत. हा वेगळा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून तब्बल ८३ लाख रुपये खर्चून ही यंत्रणा इराणी खण येथे बसवण्यात आली आहे. या यंत्राची काल यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली असून आजपासून त्याचा वापरही सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करावं, असं आवाहन यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर गणपती बाप्पाचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीनेच करण्याकडे कोल्हापूरकरांचा कल वाढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड ठेवण्यात येतात. दिवसभर कोल्हापूरकर आपल्या जवळच्या कुंडात जाऊन गणेश विसर्जन करतात आणि यानंतर या सर्व गणेशमूर्ती महानगरपालिका इराणी खण येथे घेऊन येते आणि येथील खणीत मूर्ती विसर्जन करण्यात येते.

ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर: २ तरुणांचा जागीच मृत्यू, एकाने रुग्णालयात नेताना सोडले प्राण

मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती गोळा होत असल्याने रात्री उशीरपर्यंत या मूर्ती खाली सोडण्याचे काम सुरू असते. यामुळे कामाला गती यावी व सुरक्षितरित्या मूर्तीचे विसर्जन व्हावं, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने येथे गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसवण्यात आलं आहे. तब्बल ८३ लाख रुपये किंमतीचे हे स्वयंचलित यंत्र असून याद्वारे गणेश मूर्ती पाण्यात सोडण्यात येत आहेत. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून यामुळे गणेश मूर्तींचे जलद गतीने व सुरक्षितरित्या विसर्जन होणार आहे.

शाडूच्या गणेश मूर्तींत फळा-फुलांच्या बिया, विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here