नवी दिल्ली: स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो(cristiano ronaldo)ची पार्टनर जॉर्जिना रोडिगेडज नेहमी चर्चेत असते. जॉर्जिना एक मॉडेल असून तिच्या इस्टाग्रामवरील फोटो व्हायरल होत असतात.जॉर्जिनाने नुकतेच व्हेनिस येथे सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला.

जॉर्जिना रोडिगेडज व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट येताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जॉर्जिनाने ब्लॅक ड्रेस घातला होता आणि फोटोग्राफरना, चाहत्यांना घायाळ करणारी पोझ दिली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Georgina


२८ वर्षीय जॉर्जिनाचे इस्टाग्रामवर ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी जॉर्जिना मॅनचेस्टरहून एका खासगी जेटने आली होती. जेटमध्ये देखील तिने ब्लॅक आणि पिंक ड्रेस घातला होता. याचे फोटो देखील तिने शेअर केले होते.


जॉर्जिना नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करून चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी नेटफिक्सवर जॉर्जिनाशी संबंधित एक डॉक्यूमेंट्री देखील प्रदर्शित झाली होती. यात तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी तसेच क्रिस्टियानो रोनाल्डोसोबतच्या नात्या बद्दल सांगण्यात आले आहे.


रोनाल्डो देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तो लवकरच मॅनचेस्टर युनायटेड क्लब सोडणार असल्याचे समजते. रोनाल्डो स्पेनमधील क्लबकडून खेळू शकतो. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की जॉर्जिनाच्या सांगण्यावरून त्याने हा निर्णय घेतलाय.

जॉर्जिनाने काही दिवसांपूर्वी इस्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. त्यातील बिकिनीतील फोटोमुळे एकच खळबळ उडाली होती. जॉर्जिना तिच्या सर्व मुलांसह सुट्टीवर गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here