पुणे : हिंदुराष्ट्र सेनेचा पदाधिकारी तुषार हंबीर याच्यावर रुग्णालयात घुसून तीन ते चार जणांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

ही घटना काल सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. थेट ससून रुग्णालयात शिरून हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

Chandrapur Doctors : जर्मनीत आयोजित ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत चंद्रपूरच्या डॉक्टरांचा डंका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो मोक्कामध्ये येरवडा कारागृहात बंद आहे. आजारी असल्यामुळे २५ ऑगस्टपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या ठिकाणी येऊन त्यांनी हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत हल्लेखोराने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

तुम्ही ठाकरे तर मी राणा, मी मुंबईची पोरगी, विदर्भाची सून; नवनीत राणांचा ठाकरेंवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here