Tata sons former chairman | सायरस मिस्त्री यांच्या पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्राथमिक अहवालात आहे. याशिवाय शरीराच्या अन्य अवयवांनादेखील इजा झाली. सायरस मिस्त्री यांच्या कारची चीप जर्मनीला पाठवून त्यामधील माहिती प्राप्त (Data Decode) करुन घेण्यात येईल. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारचा अपघात नेमका कसा झाला, अपघातावेळी त्यांच्या कारचा स्पीड किती होता, याविषयीचा तपशील पोलिसांच्या हाती लागेल.

हायलाइट्स:
- देशाच्या उद्योगविश्वात सायरस मिस्त्री हे बडे नाव होते
- सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला तो परिसर बऱ्यापैकी निर्मनुष्य होता
- या परिसरात सीसीटीव्ही देखील नव्हते
पालघरच्या चारोटी परिसरात ज्याठिकाणी सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला तो परिसर बऱ्यापैकी निर्मनुष्य होता. या परिसरात सीसीटीव्ही देखील नव्हते. त्यामुळे कार दुभाजकावर जोरात येऊन आदळली, यापलीकडे अपघाताची ठोस माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संपूर्ण तपास हा पूर्णपणे शक्यता आणि अंदाजांच्या आधाराने सुरु आहे. मात्र, आता सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारच्या चीपमधील माहिती तपासाच्यादृष्टीने निर्णायक ठरू शकते. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताचे रहस्य लवकरच उलगडू शकते.
प्राथमिक माहितीनुसार, सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर पोलिसांकडून अपघातस्थळी असलेल्या प्रत्येक गोष्टीचा रितसर पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांच्या विनंतीवरुन मर्सिडीज कारचे तीन अधिकारी सोमवारी सायरस मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त गाडीची पाहणी करण्यासाठी आले होते. यानंतर सायरस मिस्त्री यांच्या कारमधील चीप जर्मनीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मर्सिडीज कार ही जर्मन बनावटीची आहे. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या कारची चीप जर्मनीला पाठवून त्यामधील माहिती प्राप्त (Data Decode) करुन घेण्यात येईल. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारचा अपघात नेमका कसा झाला, अपघातावेळी त्यांच्या कारचा स्पीड किती होता, याविषयीचा तपशील पोलिसांच्या हाती लागेल. येत्या दोन ते तीन दिवसांत सायरस मिस्त्री यांच्या कारमधील चीप जर्मनीला पाठवली जाईल. त्यानंतर या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
अपघातावेळी सायरस मिस्त्रींच्या कारचा वेग १३० ते १४० किलोमीटर?
सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. यासंदर्भात कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी एक प्राथमिक अहवाल तयार केला आहे. सायरस मिस्त्री यांच्या Mercedes car ची अवस्था पाहता अपघातावेळी त्यांच्या कारचा स्पीड १३० ते १४० किलोमीटर असावा. ही मर्सिडीज कार इतक्या वेगाने दुभाजकावर आदळली की कारचे रेडिएटर फक्त चेपलेच नाही तर ते दोन ते तीन फूट आतमध्ये शिरले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.