cyrus mistry death: टाटा सन्सचे माजी संचालक आणि ख्यातनाम उद्योगपती सायरस मिस्त्रींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामध्ये मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मिस्त्री हे ५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कारमधून प्रवास करत होते.

 

cyrus 1
मुंबई: टाटा सन्सचे माजी संचालक आणि ख्यातनाम उद्योगपती सायरस मिस्त्रींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामध्ये मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मिस्त्री हे ५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कारमधून प्रवास करत होते. त्यांच्या मर्सिडीज कारमध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक सुविधा होत्या. मात्र तरीही मिस्त्री वाचू शकले नाहीत.

मिस्त्री यांच्या कारमध्ये ६ एअर बॅग्स होत्या. कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक महत्त्वाची फीचर्स देण्यात आली होती. मात्र मिस्त्री यांना एक चूक महागात पडली. भारतामधील १० पैकी ७ प्रवासी कारमध्ये मागील सीटवर बसल्यावर सीट बेल्ट लावत नाहीत. लोकलसर्कलच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. या सर्व्हेमध्ये १० हजारांहून अधिक जणांना सीट बेल्टसंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते.
कार कंपन्यांचा ‘तो’ दावा पूर्णपणे फसवा; नितीन गडकरींनी ९०० रुपयांचा हिशोब मांडला
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २६ टक्के जणांनी आपण मागील सीटवर बसल्यावर नेहमी सीट बेल्ट लावतो असं सांगितलं. तर ४ टक्के लोकांनी आपण मागील सीटवर बसून प्रवास करत नसल्याचं म्हटलं. आपण मागील सीटवर बसलो असताना कधीच सीटबेल्ट वापरत नाही, अशी माहिती देणाऱ्यांचं प्रमाण ७० टक्के होतं.
रस्ते अपघातांना जबाबदार कोण जबाबदार? नितीन गडकरी स्पष्टच बोलले
रविवारी दुपारच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई हायवेवर पालघरमध्ये मिस्त्रींच्या कारला भीषण अपघात झाला. भरधाव कार दुभाजकाला धडकली. यामध्ये मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर यांचा मृत्यू झाला. या दोघांनी सीट बेल्ट लावलेले नाहीत. त्यामुळे कारनं दुभाजकाला धडक देताच दोघेही पुढील सीटवर जाऊन आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये पुढे बसलेले दोघे वाचले. त्यांनी सीट बेल्ट लावलेले होते.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here