Authored by सरफराज सनदी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 6, 2022, 2:38 PM

husband killed his wife in sangli tasgaon : सांगलीतील तासगाव तालुक्यातील विसापूर येथे नवऱ्याने बायकोच्या माहेरी जाऊन तिच्या डोक्यात खोरे घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपी नवरा घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

 

Sangli Crime News
Sangli Crime News : सततचा वाद, नंतर घटस्फोट, डोक्यात राग घालून बायकोच्या माहेरी गेला अन्…

हायलाइट्स:

  • सततच्या वादातून नवऱ्याने केली बायकोची हत्या
  • बायकोच्या माहेरी जाऊन केली हत्या
  • सांगलीतील विसापूर येथील धक्कादायक प्रकार
सांगली : किरकोळ कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर या ठिकाणी भांडणाच्या रागातून डोक्यात खोरे घालून ही हत्या करण्यात आली आहे. बायकोच्या माहेरी येऊन नवऱ्याने ही हत्या करुन फरार झाला आहे. काजल बिरजू जाधव असे मृत विवाहित महिलेचे नाव असून याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तासगाव तालुक्यातल्या विसापूर येथील काजल हिचा सात वर्षापूर्वी खानापूर तालुक्यातल्या आळसंद येथील बिरजू जाधव यांच्याशी झाला होता. दोघांना दोन अपत्य देखील आहेत. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून दोघांमध्ये किरकोळ वादातून अनेक वेळा वादावादीचे प्रकार घडत होते. अनेकवेळा त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात देखील झालं होतं. त्यातून दोन्हीकडच्या मंडळींनी दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बिरजू आणि काजल या दोघांमधला वाद हा वाढतच गेला. त्यातूनच एक महिन्यापूर्वी बिरजू आणि काजल याचे कडाक्याचे भांडण होऊन विषय घटस्फोटापर्यंत गेला. त्यानंतर सासरच्या लोकांनी काजल हिला तिच्या माहेरी विसापूर या ठिकाणी पाठवले होते.

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राज ठाकरेंचा मेगाप्लॅन, मिशन महाराष्ट्र करणार सुरु
दरम्यान, सोमवारी बिरजू जाधव हा काजल हिच्या विसापूर गावी आला होता. सासरी मुक्कामी राहिलेल्या बिरजू याचे पहाटेच्या सुमारास काजल हिच्याशी पुन्हा भांडण सुरू झाले. दोघांच्या भांडणाचा वाद टोकाला गेला यातून बिरजू याने घरात असणाऱ्या लोखंडी खोरे पत्नी काजलच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर बिरजू याने त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. घटनेची माहिती मिळतात तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

हुकमी एक्का सोडून गेला, आता ठाकरेंच्या दोन शिलेदारांनी उस्मानाबादची जबाबदारी खांद्यावर घेतली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here