Cyrus Mistry Accident Death Funeral: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं. त्यानंतर यांच्यावर आज मंगळवारी सकाळी ११ वाजता वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्रींच्या अंत्यसंस्कारासाठी रतन टाटा यांच्या सावत्र आई सिमोन टाटा (Simone Tata) यादेखील उपस्थित होत्या. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांना अचानक हटवण्यात आलं, त्यानंतर टाटा समूह आणि मिस्त्री यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता. टाटा ग्रुप आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादानंतर सायरस मिस्त्रींच्या अंत्यसंस्काराला सिमोन टाटा यांच्या उपस्थितीला महत्त्व आहे. सायरस मिस्त्री पारशी असूनही त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर विद्युतदाहिनीत दाहसंस्कार झाले. सायरस मिस्त्रींच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.

सायरस मिस्त्री – सिमोन टाटा

५४ वर्षीय सायरस मिस्त्री हे पालनजी शापूरजी यांचे पुत्र होते, जे भारतीय वंशाचे सर्वात यशस्वी उद्योगपती होते. पालनजी शापूरजी यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यापैकी त्यांचा मोठा मुलगा शापूर मिस्त्री आणि दुसरा लहान मुलगा सायरस मिस्त्री होते. सायरस मिस्त्री यांना दोन बहीणी लैला आणि अल्लू आहेत. अल्लू यांचा विवाह रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला होता. नोएल टाटा यांच्या आई सिमोन टाटा या आहेत.

सायरस मिस्त्री – टाटा सन्स

सायरस मिस्त्री २००६ मध्ये टाटा सन्सच्या (Cyrus Mistry Tata Sons) बोर्डवर सामिल झाले होते. त्यानंतर २०१२ मध्ये ते टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. ते या टाटा सन्स ग्रुपचे सहावे अध्यक्ष होते. त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती, कारण १८ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर टाटा कंपनीची ही जबाबदारी सायरस मिस्त्रींच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. मात्र अंतर्गत वादानंतर २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांना अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. हेही वाचा – आयरिश नागरिक, रतन टाटांच्या सावत्र भावाशी बहिणीचा विवाह; सायरस मिस्त्रींचे Unknown Facts

सायरस मिस्त्रींचं अपघाती निधन

उद्योगपती सायरस मिस्त्रीचं रविवारी ४ सप्टेंबर रोजी अपघातात निधन झालं. रविवारी गुजरातच्या उदवाडामधून मुंबईत ते परत येत होते. त्यावेळी त्यांची मर्जिडिज कार दुपारी पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या पुलावर दुभाजकावर धडकली. कारमध्ये चार जण होते. त्यापैकी दोघांचा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. सायरस मिस्त्रींच्या निधनाने उद्योग जगतासह संपूर्ण देशच हादरला असून अनेकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

सायरस मिस्त्रींवर अंत्यसंस्कार

सायरस मिस्त्री यांच्या अंत्यसंस्कारासाठी पारशी समुदायाचे सदस्य, अनेक नेते मंडळी सामिल झाले होते. त्याशिवाय वरळीतील स्मशानभूमीत साररस मिस्त्रींचे मोठे भाऊ शापूर मिस्त्री, सायरस मिस्त्रींचे सासरे आणि वरिष्ठ वकील इक्बाल छागला, उद्योगपती अनिल अंबानी, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, सुप्रिया सुळे आणि मिलिंद देवरा देखील उपस्थित होते. सायरस मिस्त्री हे पारशी होते, त्यामुळे त्यांच्यावर पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार होतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हेही वाचा – Cyrus Mistry: कोण होते सायरस मिस्त्रींचे अब्जाधीश आजोबा, ज्यांनी मधुबालाच्या गाण्यासाठी पाण्यासारखा खर्च केला पैसा!

हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

पारशी समूदाय एखाद्याच्या निधनानंतर मृतदेह स्मशानभूमीत जाळत किंवा पुरत नाहीत. मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी ठेवला जातो. मुंबईत ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ इथे मृतदेह ठेवले जातात. अतिशय गर्द झाडीने वेढलेल्या या भागात मृतदेह ठेवला जातो आणि गिधाडं हा मृतदेह खातात आणि अशाप्रकारे मृतदेहाचं विघटन होतं. परंतु सायरस मिस्त्रींवर पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यांच्यावर हिंदू पद्धतीने दाहसंस्कार (Cyrus Mistry Funeral) करण्यात आले. वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here