Tata Sons former chairman | टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर दाहसंस्कार झाले. यानंतर सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

 

Cyrus Mistry Supriya Sule
सायरस मिस्त्री आणि सुप्रिया सुळे

हायलाइट्स:

  • सायरस मिस्त्री अनंतात विलीन
  • सायरस मिस्त्री यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
  • पालघर परिसरात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये निधन झाले होते
मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्योगविश्वासह राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे. सायरस मिस्त्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कौटुंबिक संबंध होते. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अकाली निधनामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सायरस यांच्याविषयीच्या आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर सायरस मिस्त्री यांच्यासोबतची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमधून सुप्रिया सुळे आणि सायरस मिस्त्री यांच्यात असलेला जिव्हाळा दिसून येत आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. आम्हाला तुझी नेहमीच उणीव जाणवेल. सायरस तुझ्या आत्म्याला शांती मिळो, असे सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
Sharad Pawar: आमच्यात जनरेशन गॅप असल्याने सायरस मिस्त्रींना तेव्हा फार भेटलो नाही, पण…
सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी पालघर परिसरात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये निधन झाले होते. त्यांची मर्सिडीज कार दुभाजकावर आदळली होती. यामध्ये सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे सायरस मिस्त्री जागीच गतप्राण झाले होते. सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी दुपारी मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरु आहे. हा अपघात कसा झाला, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारमधील चिप जर्मनीला पाठवली जाणार आहे.
Cyrus Mistry: गेल्या दोन वर्षांत मिस्त्री कुटुंबावर अनेक संकटं, सायरस यांचा मृत्यू धक्कादायक: शरद पवार

‘सायरस मिस्त्री हक्कानं फोन करायचे, वरणभात, खिचडी करुन ठेव म्हणायचे’

सायरस मिस्त्री यांचे रविवारी निधन झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. सायरस मिस्त्री खूप साधेपणानं वागत होते. ते अतिशय साधेपणानं वागायचे. मला ते फोन करुन सांगायचे की जेवायला येणार आहे, वरण भात, थालीपीठ, शेवपुरी पाहिजे, खिचडी पाहिजे इतकं हक्काने ते सांगायचे त्यांचा अपघाती मृत्यू होणं हे खूप धक्कादायक आणि सदानंद सुळे आणि माझ्यासाठी वैयक्तिक हानी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here