Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 7, 2022, 6:56 AM

Aurangabad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यात सख्या भावानेच आपल्या भावावर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या अंत्यविधीच्या खर्चाच्या पैशावरुन हे कृत्ये केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

Aurangabad Crime News
Aurangabad Crime News : बहिणीच्या अंत्यविधीसाठी झालेल्या खर्चाचे पैसे दे; सख्या भावाने केलं भावासोबत…

हायलाइट्स:

  • पैशावरून भावाचा-भावावर ब्लेडने हल्ला
  • बहिणीच्या अंत्यविधीच्या खर्चाच्या पैशावरुन वाद
  • औरंगाबादमधील धक्कादायक घटना
औरंगाबाद : “बहिणीच्या अंत्यविधीसाठी झालेल्या खर्चाचे पैसे दे”, असे म्हणत भावानेच भावावर धारदार ब्लेडने हल्ला केल्याची घटना औरंगपुरा भाजीमंडई येथे घडली. या प्रकरणी आरोपीवर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर महादेव गौडा (रा.नारळीबाग, गल्ली नंबर ३) असे आरोपीचे नाव आहे.

सनी महादेव गौडा (रा. नारळीबाग) यांची फिर्याद अशी की, ईश्वर आणी सनी दोघेही भाऊ असून काही दिवसापूर्वी त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला होता.अंत्यविधीसाठी ईश्वरचे तीन हजार रुपये खर्च झाले होते. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आरोपी हा सनी याच्याकडे गेला आणि ताईच्या अंत्यविधीसाठी माझे तीन हजार रुपये खर्च झाले आहे. ते तू मला आत्ताच दे, असे म्हणाला.

सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर केंद्र सरकार ॲलर्ट; ‘सीट बेल्ट’बाबत घेणार मोठा निर्णय
मात्र माझ्याजवळ आता पैसे नाहीत, मी एटीएम मधून काढून तुला देतो असे सनी समजावून सांगत असताना आरोपी ईश्वरने त्याच्या हातातील ब्लेडने मानेजवळ वार केला. या हल्ल्यात सनी जखमी झाला असून त्यावर रुग्णाल्यात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन ‘निर्विघ्न’; उच्च न्यायालयाकडून याचिका निकाली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here