आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी विलीनीकरण आणि अधिग्रहण रणनीतीसाठी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहेत. ब्ल्यूमबर्गनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अदानी समूह सध्या विविध क्षेत्रांमध्ये पाऊल टाकत आहे. याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांमध्ये जोरदार विस्तार सुरू आहे. त्यामुळे गौतम अदानी यांच्यासाठी समूहातील विलीनीकरण आणि अधिग्रहण रणनीतीची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याचं महत्त्व अतिशय जास्त आहे.

विनोद बहेती सध्या अदानी समूहात विलीनीकरण आणि अधिग्रहण रणनीतीकार म्हणून काम पाहतात. मात्र ते लवकरच एका नव्या व्हेंचरमध्ये जातील. त्याची औपचारिक घोषणा याच महिन्यात होऊ शकते. त्यामुळे आता अदानी समूहानं विलीनीकरण आणि अधिग्रहण रणनीतीकाराचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू आहे.
वा रे पठ्ठ्या, अंबानींच्या कंपनीत नऊ वर्ष नोकरी, आता तीच खरेदी करण्याची तयारी
काम काय असणार?
अदानी समूहात रिक्त होत असलेली जागा विलीनीकरण आणि अधिग्रहण रणनीतीशी संबंधित आहे. अदानी समूहात एखाद्या कंपनीचं विलनीकरण करायचं असल्यास आणि समूहाकडून एखाद्या कंपनीचं अधिग्रहण करायचं झाल्यास त्यासाठीची रणनीती आखण्याचं काम नव्या अधिकाऱ्याला करावं लागेल. त्यासाठीची आवश्यक तयारी करावी लागेल. सूचना द्याव्या लागतील.

अदानी सध्या काय करताहेत?
सध्या अदानी डेटा सेंटर, विमानतळं, डिजिटल सेवा, माध्यमं आणि वीज क्षेत्रातही काम करत आहेत. बंदरं, विमानतळांच्या संचालनाचं काम समूह करतो. या क्षेत्रातील खासगी कंपन्यांचा विचार केल्यास सर्वाधिक बंदरं आणि विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाकडेच आहे. वायू वितरण, कोळसा या क्षेत्रातही अदानींचा दबदबा वाढला आहे.
पाच सहकारी बँकांना RBI चा दणका, ठोठावला लाखोंचा दंड, जाणून घ्या यामागचं कारण
वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूहानं भारताच्या होल्सिम ए जी के सिमेंटचा व्यवसाय १०.५ बिलियन डॉलर मोजून खरेदी करण्याची दर्शवली होती. याशिवाय हरित उर्जेत ७० बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा समूहानं केली आहे. अदानी यांची एकूण संपत्ती १३७.४ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ११ लाख कोटी रुपये इतकी आहे. ब्ल्यूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या स्थानी आहेत. पहिल्या क्रमांकावर एलन मस्क आणि दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here