नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकानं पोलिसांच्या उपस्थितीत सासऱ्यांना मारहाण केली. तिनं वारंवार सासऱ्यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी उपनिरीक्षकेची आई तिथेच उपस्थित होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक महिलेनं तिच्या सासऱ्यांना कानशिलात दिल्याचा प्रकार रविवारी घडला. सासऱ्यांच्या घरीच ही घटना घडली. या प्रकरण उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आणि तिच्या आईचा सासऱ्यांशी वाद झाला. भांडण सुरू असताना उपनिरीक्षकानं सासऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या आईनंदेखील वृद्ध सासऱ्यांवर हात उचलला. तिथे उपस्थित असलेला एक पोलीस कर्मचारी वृद्धाच्या बचावासाठी पुढे आला.
कोल्हापूर: स्कूलबस चालवताना हार्ट अटॅक, ३५ वर्षांच्या चालकाने आधी विद्यार्थ्यांना वाचवलं, मग जीव सोडला
मारहाणीच्या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. व्हायरल व्हिडीओ लक्ष्मी नगरचा असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ आणि ४२७ च्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी या प्रकरणाची माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त प्रियंका कश्यप यांनी सांगितलं.
टीव्ही वरुन वाद, अंबरनाथमध्ये सुनेने घेतला सासूच्या बोटांचा चावा
दक्षिण जिल्ह्याच्या डिफेन्स कॉलनीमध्ये तैनात असलेल्या महिला उप-निरीक्षकाचा सासरच्या मंडळींशी वाद आहे. वैवाहिक वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. दक्षिण जिल्हा पोलीस या प्रकरणात आवश्यक कारवाई करतील, असं कश्यप म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here