india vs sri lanka asia cup 2022: शेवटच्या षटकात लंकेला केवळ ७ धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंगनं या षटकात उत्तम गोलंदाजी केली. त्यानं श्रीलंकन फलंदाजांना संघर्ष करायला लावला. फारसा अनुभव नसतानाही अर्शदीपनं टिच्चून मारा केला. या षटकादरम्यान अर्शदीप सिंग अनेकदा रोहित शर्मासोबत बोलत होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

arshdeep
दुबई: आशिया कपच्या सुपर फोरमध्ये सलग दोन पराभव पत्करावे लागल्यामुळे टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेनं भारताचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठण्याच्या आशांना सुरुंग लावला. श्रीलंकेनं प्रथम गोलंदाजी करताना भारताला १७३ धावांत रोखलं. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाला २० च्या वर धावा करता आल्या नाहीत. रोहितनं ४१ चेंडूंमध्ये ७२ धावांची खेळी साकारली.

भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. कुसल मेंडिस आणि पाथुन निसंका यांनी ९७ धावांची भागिदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. शेवटच्या २ षटकांमध्ये श्रीलंकेला विजयासाठी २१ धावांची गरज होती. रोहितनं चेंडू भुवनेश्वर कुमारकडे गेला. कुमार कमीतकमी धावा देईल अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या षटकात १४ धावा कुटल्या गेल्या.

शेवटच्या षटकात लंकेला केवळ ७ धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंगनं या षटकात उत्तम गोलंदाजी केली. त्यानं श्रीलंकन फलंदाजांना संघर्ष करायला लावला. फारसा अनुभव नसतानाही अर्शदीपनं टिच्चून मारा केला. या षटकादरम्यान अर्शदीप सिंग अनेकदा रोहित शर्मासोबत बोलत होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमच्या बॅट्समनना कळत नाही की… रोहित शर्मा भडकला, पराभवाची ३ कारणे सांगितली
रोहित शर्माचं शेवटच्या षटकातलं वर्तन चाहत्यांना आवडलेलं नाही. युवा गोलंदाज अर्शदीप रोहितसोबत बोलायला गेला असताना रोहितनं त्याच्याकडे पाठ फिरवली. रोहित तिथून निघून गेला. ते पाहून अर्शदीप नाराज झाला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव सगळं काही सांगून गेले. तरुण गोलंदाज तुझ्याशी बोलतोय, त्याचं किमान ऐकून तरी घ्यायचं होतं, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्हायरल झालेल्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here