इंटरनेटवर व्हायरस झाला व्हिडिओ
हा व्हिडिओ फेसबुक यूजर चंदन सिंग याने १ सप्टेंबर रोजी शेअर केला होता. ‘साप कानात गेला’, असे त्याने या व्हिडिओला कॅप्शन लिहिले आहे. ही क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला ५० हून अधिक लाइक्स आणि तीन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
यासोबतच युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मात्र, कानात साप गेलाच कसा, असा प्रश्न अनेक यूजर्सना पडलेला आहे. तर काहींनी फेसबुक यूजर्सनी संपूर्ण व्हिडिओ शेअर करा अशी सूचनाही केल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओत नेमके काय आहे?
३.४९ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर महिलेच्या कानात घुसलेल्या पिवळ्या रंगाचा साप काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपण पाहू शकतो. डॉक्टरांनी हातात हातमोजे घातले आहेत आणि छोट्या चिमट्याच्या सहाय्याने सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर सापाला काही इजा होणार नाही याचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
डॉक्टरांनी चिमट्याने सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने तोंड उघडल्याचे दिसून येते. ही प्रक्रिया किती वेदनादायी आहे, हे त्या महिलेच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया स्पष्टपणे सांगत आहेत.