मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही आरती केली. यानंतर मुख्यमंत्री अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले.

यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याघरी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.
कसबा पेठ, त्वष्टा कासार, तरूण अशोक मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, यशवंतनगर गणेशोत्सव मंडळ, साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी गणेशमंडळांना एकनाथ शिंदे भेट देणार असल्याची माहिती आहे.