snake bite death, संसार फुलू लागला आणि काळाने घाला घातला; लहानग्या मुलाला मागे सोडून २४ वर्षीय महिलेने घेतला जगाचा निरोप – a 24 year old woman died of snake bite at pethshiwani in palam taluka
परभणी : घरकाम करत असताना साप चावल्याने २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील पेठशिवानी येथे मंगळवारी घडली आहे. शितल बापूराव मामीलवाड असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे पेठशिवानी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून मामीलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पेठशिवानी येथील शितल बापूराव मामीलवाड या ६ सप्टेंबर रोजी घरकाम करत असताना त्यांना सापाने अचानक चावा घेतला. ही बाबा त्यांच्या लक्षात आल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र साप विषारी असल्याने शितल यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मामीलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Mumbai Rain: मुंबई, ठाण्याच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, मुसळधार पावसाला सुरुवात
मृत शितल मामीलवाड यांचं काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू, दीर असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे पेठशिवानी गावामध्ये हळहळ वेक्त केली जात आहे.
यंदा पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पिके देखील जोमात आहेत. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यग्र आहेत. अशातच शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याच्या घटना जिल्ह्यामध्ये वाढल्या आहेत. सर्पदंश झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना घडल्या असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचं झालं आहे.