दुबई : श्रीलंकेने भारताला पराभूत केले आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता भारताला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने चिटींग केल्याचे समोर आले आहे. कारण भारताच्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या संघाने मैदानाबाहेरून फिल्डिंग लावल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

श्रीलंकेच्या संघासाठी यावेळी कोहलीची विकेट मोलाची होती. कारण यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे कोहलीने या सामन्यातही दमदार खेळी साकारली असती तर श्रीलंकेच्या गोलंदाजांचे काही खरे नव्हते. त्यामुळे कोहलीला लवकर कसे बाद करायचे, यासाठी श्रीलंकेच्या संघाने मैदानाबाहेरून जोरदार फिल्डींग लावली होती आणि या गोष्टीमध्ये ते यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण कोहली यावेळी शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकेश राहुल बाद झाल्यावर जेव्हा कोहली फलंदाजीला आला तेव्हा श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या प्रशिक्षकांनी एक खास मेसेज केला. हा मेसेज त्यांना पेव्हेलियनमध्ये बसूनच केला. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वहवूड यांनी यावेळी पेव्हेलियनमधून एक फलक श्रीलंकेच्या खेळाडूंना दाखवला. या फलकावर ‘4 A’ असं लिहिलेलं होतं हा एक कोड आहे, जो अजूनपर्यंत श्रीलंकेच्या संघाला सोडले तर कोणालाच समजलेला नाही. पण हा कोड श्रीलंकेच्या संघासाठी फलदायी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण या कोडनुसार त्यांनी मैदानात अंमबजावणी केली आणि त्यामुळे श्रीलंकेला कोहलीला क्लीन बोल्ड करता आले. श्रीलंकेने यावेळी कोहलीला यावेळी भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे श्रीलंकेची ही रणनिती यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. पण ही रणनीती नसून चिटींग असल्याचे मत बऱ्याच चाहत्यांनी व्यक्त केले आहे. कारण क्रिकेटमध्ये अशी गोष्ट चालत नसल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

भारतीय संघाने यावेळी भारतााल प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर लोकेश राहुलला त्यांनी फक्त सहा धावांमध्ये तंबूत धाडले. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. पण विराटला यावेळी त्यांनी भोपळाही फोडू दिला नाही.

श्रीलंकेची रणनिती कोहलीबाबत यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. पण ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य, यावर क्रिकेट विश्वात सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे याबाबत आता कोणता निर्णय आयसीसी घेते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here