जळगाव : जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला आयशरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ घडली. या अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांद्वारे जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले.