Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 7, 2022, 7:33 PM
Satara Nagarpalika Election | सातारा नगरपालिकेत आम्ही सर्व ५० उमेदवार हे काम करणारे दिले आहेत. हे उमेदवार लोकांसाठी झटणारे आहेत. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे सर्व ५० उमेदवार निवडून येतील, असा दावा उदयनराजे भोसले यांनी केला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाही अनेक चिमटे काढले. या टीकेला शिवेंद्रराजे काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- शिवेंद्रराजे यांच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
- निवडणुकीचा निकाल आजच लागल्यात जमा आहे
सातारा नगरपालिकेत आम्ही सर्व ५० उमेदवार हे काम करणारे दिले आहेत. हे उमेदवार लोकांसाठी झटणारे आहेत. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे सर्व ५० उमेदवार निवडून येतील, असा दावा उदयनराजे भोसले यांनी केला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाही अनेक चिमटे काढले.
शिवेंद्रराजे यांच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. निवडणुकीचा निकाल आजच लागल्यात जमा आहे. उगाच मिशा पिळून किंवा मिशांवर ताव मारून गोष्टी होत नसतात. त्याला इकडे-तिकडे फिरावे लागते. मी नगरसेवक पदापासून सुरुवात करुन खासदार झालो आहे. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. लोकांमध्ये कसं मिसळायचं, कसं काम करायचं, हे मला ठाऊक आहे. पण यांना सोन्याच्या थाळीत आमदारकी सजवून मिळाली आहे, अशी खोचक टिप्पणी करत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना डिवचले. त्यामुळे आता या टीकेला शिवेंद्रराजे काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
साताऱ्याच्या माजी जिल्हाधिकाऱ्यांना उदयनराजेंनी फटकारले
साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली होऊन तब्बल एक महिना उलटला तरी सुद्धा त्यांनी अजून शासकीय बंगला खाली केला नाही. यामुळे नवीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सातारा रेस्ट हाऊस मध्ये राहावं लागत आहे. त्यावरून उदयनराजे यांनी शेखर सिंग यांना फटकारले होते.
उदयनराजेंनी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना हात जोडत “आता तरी बास करा बंगला खाली करुन नवीन जिल्हाधिकारी यांना द्या”, असं म्हटलं आहे. “साताऱ्यावर एवढं प्रेम असेल तर माझा राजवाडा आहे तिथं येऊन राहू शकता शनिवार, रविवार आपण या ठिकाणी आलात तरी माझी हरकत नाही”, असं म्हणत शेखर सिंग यांना चांगलाच टोला लगावला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.