चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दोन थरारक घटना घडल्या आहेत. नदीच्या पुलावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहने थेट नदीवरील पुलाला जाऊन आदळली. मात्र लटकत असलेली ही वाहने सुदैवाने नदीत मात्र कोसळली नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर-राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. पुलाचे कठडे तोडून टेम्पो लटकला. परंतु हा अपघाग्रस्त टेम्पो नदी पात्रात कोसळला नाही. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे.

चंद्रपुरातील धामनपेट अतिसाराच्या विळख्यात; ५ रुग्णांचा मृत्यू, २० रूग्णांची प्रकृती चिंताजनक

दुसरीकडे, वैनगंगा नदीवरील हरणघाट पुलावरही असाच काहीसा प्रकार घडला आहे. धान्याचे पोते भरलेला ट्रक मूल शहराकडे जात असताना वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. मात्र हा ट्रकही नदीपात्रात कोसळला नाही. पुलाच्या कठड्यावर लटकलेला ट्रक बघून ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय उपस्थितांना आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here