वाचा:
जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून कणकवली नजीकच्या असलदे गावातील रिक्षाचालक याला अपघातात जीव गमवावा लागला आहे. हायवेवरील पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने रिक्षाला अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक जेठे गंभीर जखमी झाला. आज त्याचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे ठेकेदार कंपनीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. गंभीर बाब म्हणजे पावसाळा सुरू होऊन काही दिवसच झाले असताना महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल आला आहे. कणकवली जवळच्या पुलाला भेगा पडल्याने त्याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या दालनात ठेकेदार कंपनी, संबंधित अधिकारी आणि नागरिक यांची एक बैठक झाली. त्यात प्रांताधिकाऱ्यांनीही महामार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सिंधुदुर्ग व जिल्ह्यांत पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. उद्या १८ जून रोजी या दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वाचा:
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines