PAK VS AFG : पाक आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या फलंदाजाने यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूवर चक्क बॅट उगारल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात असं नेमकं घडलं तरी काय की, जेणेकरून हा राडा झाला. यावेळी मैदानात नेमकं काय घडलं आणि कशामुळे हे सर् सुरु झालं, पाहा हा खास व्हिडिओ

ही गोष्ट सामन्याच्या १९व्या षटाकत घडली. पण पाकिस्तानने अखेरच्या षटकात थरारक विजय साकारला. पहिल्याच षटकात पाकिस्तानला बाबर आझमच्या रुपात मोठा धक्का बसला. बाबरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यावेळी पाकिस्तानची १ बाद १ धाव अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यामुळे पाकिस्तानचा डाव अडचणीत आला. पाकिस्तानने आपला अर्धा संघ ९७ धावांमध्ये बाद झाला. त्यानंतर १३ धावांमध्ये पाकिस्तानने अजून तीन विकेट्स गमावले आणि त्यांची ८ बाद ११० अशी अवस्था झाली होती. त्यामुळे हा सामना आता कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती. कारण पाकिस्तानला जिंकण्यासाठी यावेळी २० धावांची गरज होती, तर दोन विकेट्स मिळवत अफगाणिस्तानचा संघ विजयी ठरू शकत होता आणि या परिस्थितीवर भारताच्या आशा अवलंबून होत्या. त्यानंतर १९व्या षटकात पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आणि त्यांची ९ बाद ११८ अशी अवस्था झाली होती. पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. पाकिस्तानच्या नसीम शाहने २०व्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूवर षटकार खेचले आणि संघाला थरारक विजय मिळवून दिला. त्यामुळए पाकिस्तानचा संघ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.