Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 8, 2022, 6:56 AM

Parbhani Accident News : परभणीत एका भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीवरील एकजण गंभीर जखमी झाला आहे. मागील काही दिवसापासून ब्राम्हणगाव पाटीजवळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

 

Parbhani Accident News
Parbhani Accident News : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

हायलाइट्स:

  • भरधावकारची दुचाकीला समोरून धडक
  • एकाचा जागीच मृत्यू , एक जण जखमी
  • परभणी-गंगाखेड महामर्गावरील घटना
परभणी : एका भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीवरील एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून कारसह पळ काढला आहे. सुनिल भगवान वाटूरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर किरण विठ्ठलराव पांचाळ असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुनिल भगवान वाटूरे आणि किरण पांचाळ हे दुचाकीवरून गंगाखेडच्या दिशेने जात होते. याचवेळी गंगाखेडवरून परभणीकडे येत असलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी परभणी – गंगाखेड महामार्गाच्या खाली जाऊन पडली. या अपघातामध्ये दुचाकी चालक सुनिल वाटूरे यांचा चागीच मृत्यू झाला आहे. तर किरण पांचाळ हा जखमी झाला आहे. मयत सुनिल वाटूरे याचे परभणी जिल्हा सामान्य रूग्णालायात शवविच्छेदन करण्यात आले आहे. जर जखमी किरण पांचाळ याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसापासून ब्राम्हणगाव पाटीजवळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गतिमान महाराष्ट्रासाठी सरकार सरसावले; ड्रीम प्रोजेक्टसाठी मुख्यमंत्र्यांची वॉर रुम, ‘या’ प्रकल्पांवर देखरेख
अशी पटली कारची ओळख

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर सुनिल वाटूरे याचा जागीच मृत्यू झाल्यामुळे कारचालकाने घटनास्थळावरून कारसह पळ काढला. मात्र, अपघातामध्ये जखमी झालेला किरण पांचाळ यांनी कारचा नंबर पाहिल्याने कारची ओळख पटली आहे. या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजत आहे.

राज्यातील विकासकामांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल; नीती आयोगाच्या धर्तीवर सल्लागार समिती

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here