Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 8, 2022, 7:16 AM
Yavatmal News : खेकडे व मासे पकडण्यासाठी जामवाडी ते हेटी मार्गावरील नाल्यावर गेलेल्या दोन तरुणांचा शेतातील विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हायलाइट्स:
- खेकडे पकडणे जीवावर बेतले
- शॉक लागून दोघांचा मृत्यू
- यवतमाळ येथील घटना
दोघेही रात्री खेकडे आणि मासे पकडण्यासाठी जामवाडी ते हेटी नाल्यावर गेले होते. परंतु काही अंतरावर जातानाच त्यांना दशरथ झुनबाजी कालीकार यांच्या शेतामध्ये आणि नाल्यामध्ये जिवंत विद्युत तार असल्याने या दोघांनाही विद्युत तारेचा स्पर्श झाला. दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
विजेचा जोरदार शॉक बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. कालीकार यांचे शेत हेटी रस्त्याला लागूनच असून नाल्याच्या दोन्ही बाजूने त्यांचे शेत असल्याने त्यांनी शेताला वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी करंट लावले होते. छत्रपती अविवाहित तर श्रावण विवाहित असून त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे, अनिल सांगळे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.