मुंबई : पाकिस्तानचा फलंदाज नसीम शाहने अखेरच्या षटकातील २ चेंडूवर २ षटकार लगावले अन् अफगाणिस्तानला १ विकेट्सने नमवून आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. पाकिस्तानला शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना नसीम शहाने फजलहक फारुकीला दोन गगनचुंबी षटकार मारुन अफगाणिस्तानला अस्मान दाखवलंच त्याचबरोबर भारताच्या फायनल खेळण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पाकिस्तानच्या विजयानंतर भारताचं आशिया कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. आता आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या दोन संघादरम्यान होणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने विजयानंतर माध्यमांशी बोलताना भारताच्या जमखेवर मीठ चोळणारं विधान केलंय.

सामना संपल्यानंतर बाबर पुरस्कार सोहळ्यात बोलताना म्हणाला, “खरं सांगायचं तर ड्रेसिंग रुममध्ये खूप तणावाचं वातावरण होतं. गेल्या काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही आम्हाला उत्तम भागीदारी करता आली नाही. मात्र, नसीमने ज्या प्रकारे सामना संपवला, त्यानंतर मात्र ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला. मला नसीम शहावर विश्वास होता. तो सामना फिरवणार याची मला खात्री होती”

आमच्या बॅट्समनना कळत नाही की… रोहित शर्मा भडकला, पराभवाची ३ कारणे सांगितली
बाबरने भारताच्या जखमेवर मीठ चोळले

भारताविरुद्ध जावेद मियांदादने १९८६ मध्ये याच मैदानावर शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराशी बाबरने नसीमच्या षटकाराची तुलना केली. ‘मी नसीमला अशी तोडफोड फलंदाजी करताना पाहिलं आहे, त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास होता. या मैदानावर मला मियांदादच्या सिक्सची आठवण झाली, असं म्हणत त्याने पाकच्या विजयानंतर आणि अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताला डिवचण्याची संधी सोडली नाही.

तर मी बाकी खेळाडूंनाही संधी देणार, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचं कौतुक

बाबर आझमने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. “राशीद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी हे सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविरुद्ध खेळताना खूप समजून उमजून खेळण्याची गरज असते”

आम्ही झुंजलो-लढलो, सामन्यात कुठल्याच क्षणी हार मानली नाही

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. परंतु संघाच्या पराभवानंतर निराशा देखील व्यक्त केली. “आमच्या खेळाडूंनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी केली. आम्ही पुन्हा सामना आमच्या बाजूने फिरविण्यात अपयशी ठरलो. आम्ही सामन्यात कुठल्याच क्षणी हार मानली नाही. मी फारुकीला शेवटच्या षटकात अचूक यॉर्कर किंवा स्लो बाउन्सर टाकायला सांगितले होते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here