पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक प्रकार घडला आहे. हुंड्यासाठी छळ होत असल्याचा गुन्हा पत्नीनं दाखल केला. त्याचा बदला घेण्यासाठी पतीनं पत्नीचा फोन नंबर ३० मित्रांना दिला. त्यांनी तिला अश्लील मेसेज पाठवले. मंगळवारी पीडितेनं पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदवली.

पत्नीनं गुन्हा दाखल केल्यानं आकाश संतापला. त्यानं तिची बदनाम करण्यासाठी तिचा फोन नंबर ३० मित्रांना दिला. यानंतर पत्नीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ येऊ लागले. याची तक्रार पत्नीनं स्थानिक पोलीस ठाण्यात केलं. मात्र ती तक्रार गांभीर्यानं घेतली गेली नाही. त्यामुळे तिनं पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी उपायुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पतीची तक्रार केल्यानं, त्याच्याविरोधात हुंडाविरोधी कायद्याच्या अंतर्गत एफआयआर दाखल केल्यानं त्यानं आपला नंबर मित्रांना दिला. त्यानंतर मला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ येऊ लागले. या सगळ्या प्रकारामुळे मला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मला जगणं अवघड झालं आहे. मला न्याय मिळावा यासाठी मी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्याची व्यथा पीडितेनं मांडली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.