Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 8, 2022, 12:07 PM
Yavatmal News : आपला जीव धोक्यात घालून प्रेतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. यवतमाळ माळकिन्ही येथील गंभीर प्रकार आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

हायलाइट्स:
- नाल्याच्या पुरातून नेला अंत्यसंस्कारासाठी मृतदेह
- यवतमाळ माळकिन्ही येथील गंभीर प्रकार
- स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने नागरिकांना त्रास
नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला असता दिवसभर धुव्वाधार पाऊस पडत होता अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहनशेड मध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाईकांनी ठरविले. परंतु पाऊस थांबता थांबेना व नाल्याला जोरदार पूर होता व नाल्याच्या दुसऱ्या जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होत असल्याने नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधून तिरडी खांद्यावर घेऊन एकमेकांच्या सहाय्याने छातीपर्यंत पाणी असलेल्या नाल्याच्या पुरातून वाट काढीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
लव जिहाद प्रकरण; अमरावतीमधील बेपत्ता मुलीचा शोध लागला, आज अमरावतीत आणणार
या गंभीर घटनेमुळे प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. माळकिन्ही हे गाव हिंगोली लोकसभा व उमरखेड विधानसभा क्षेत्रात येत असून खा.हेमंत पाटील व आ.नामदेवराव ससाणे या दोन्ही लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून येत असून ते सत्तेच्या खेळात मश्गुल असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.