bengaluru electrocution death: बंगळुरूतील पुरानं एका २३ वर्षीय तरुणीचा बळी घेतला. पुरातून प्रवास करत असताना विजेचा धक्का लागल्यानं अखिलाला जीव गमवावा लागला. अखिला आमच्या कुटुंबाचा एकमेव आधार होती. आमच्या कुटुंबातील तीच एक कमावती होती. ती आता आमच्यात नाही यावर विश्वास ठेवणं अवघड जात असल्याचं म्हणत अखिलाचे वडील सोमाशेखर यांनी आक्रोश केला.

 

akhila
बंगळुरू: गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूत मुसळधार पाऊस सुरू आहे. भारताचं आयटी हब अशी ओळख असलेलं शहर पाण्याखाली गेलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्यानं लोकांचे हाल होत आहेत. अनेक तरुण उद्योजकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. स्टार्टअप कंपन्या सुरू करणाऱ्या अनेक उद्योजकांना त्यांचे बंगले सोडावे लागले आहेत. बंगळुरूतील पुरानं एका २३ वर्षीय तरुणीचा बळी घेतला. पुरातून प्रवास करत असताना विजेचा धक्का लागल्यानं अखिलाला जीव गमवावा लागला.

अखिला आमच्या कुटुंबाचा एकमेव आधार होती. आमच्या कुटुंबातील तीच एक कमावती होती. ती आता आमच्यात नाही यावर विश्वास ठेवणं अवघड जात असल्याचं म्हणत अखिलाचे वडील सोमाशेखर यांनी आक्रोश केला. बीकॉम झालेली अखिला सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होती. त्यावेळी तिची दुचाकी वार्थूर कोडी आणि कुंडालाहल्ली दरम्यान बंद पडली.
आधी सहकाऱ्यांना अभिनंदनाचा मेसेज; मग पोलिसाची पत्नी, लेकीसोबत बाराव्या मजल्यावरून उडी
पुराच्या पाण्यातून वाट काढत असताना दुचाकी बंद पडल्यानं अखिलाचा तोल गेला. ती पाण्यात पडली. अखिलाच्या बाजूलाच दुभाजक होता. त्यावर असलेल्या होल्डिंगचा आधार घेऊन अखिलानं उठण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला विजेचा धक्का बसला. त्यावेळी अखिलासोबत तिचा सहकारी सुब्रमण्यम होता. त्यानं तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र पुरातून वाट काढत रुग्णालय गाठेपर्यंत बराच वेळ गेला. यावेळी आसपास असलेल्या कोणत्याच वाटसरूनं त्यांना मदत केली नाही.
कीटकनाशक प्यायले अन् मंदिरात जाऊन बसले; मेडिकल व्यावसायिकाच्या आत्महत्येनं खळबळ
सुब्रमण्यमचा फोन आल्यानंतर आम्ही लगेचच रुग्णालय गाठलं. मात्र आमची लेक आम्हाला सोडून गेली होती, अशा शब्दांत अखिलाची आई पद्मानं भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी सोमशेखर यांनी बृहत बंगळुरू महानगरा पालिका आणि वीज पुरवठादारा कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पालिका आणि कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच आम्हाला आमची मुलगी गमवावी लागली, असा आरोप सोमशेखर यांनी केला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here