car fell in lake while taking reverse: औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग महादेव मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या तलावात एक कार बुडाली. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कार रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडला. कारमधील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बुधवारी पहाटे औढा येथे आलेले चक्रधर गावी आलेच नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. तसेच ते बेपत्ता असल्याची माहितीही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता कार तलावात पडल्याचे आढळून आले. पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे,जमादार संदीप टाक, इम्रान पठाण यांचे पथक रात्री घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. मात्र त्यात चक्रधर यांचा मृतदेह नव्हता. त्यामुळे तलावात शोध मोहीम सुरु केली असता चक्रधर यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आज सकाळी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात चक्रधर यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.