लक्षवेधी बाब म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या केलेल्या मागणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. शिंदे गटाच्या याच भूमिकेवर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सडकून टीका केली आहे. आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण चिन्ह गोठवा म्हणतात, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केलाय. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून माध्यमांना प्रतिक्रिया देताना किंबहुना जनसभांना संबोधित करताना वारंवार आम्ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. आमच्याबरोबरचे सगळे खरे शिवसैनिक असल्याचं सांगत आमदार-खासदारांचा आकडाही वारंवार सांगत आहेत. हाच धागा पकडून केदार दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.

हायलाइट्स:
- धनुष्यबाण चिन्ह गोठवा, शिंदे गटाची कोर्टात मागणी
- धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंची शिंदेवर टीका
- आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण गोठवायला निघाले
एकनाथ शिंदे गटाने आयोगाला २८ चिन्हाबाबत निर्णय घेण्याची अनुमती याची द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुनावणीसाठी असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांच्या अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांना पाचारण करणे व इतर काही याचिकांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मज्जाव करावा, असा अर्ज दाखल केला. आयोगाचे वकील अरविंद दातार म्हणाले की, एखाद्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेतल्यास निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागतो. मात्र ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपील सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद करत शिवसेनेतल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या पक्षचिन्हाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाला तूर्तास पक्षचिन्हाचा निर्णय घेऊ देऊ नका, अशी विनंती केली. कोर्टाने ती विनंती मान्य करत २७ तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षचिन्हावर निर्णय घेऊ नये. २७ तारखेला १० मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घटनापीठ पुढचा निर्णय देईल, असं कोर्टाने म्हटलं.
आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे बाळासाहेबांची निशाणी गोठवायला निघालेत!
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून माध्यमांना प्रतिक्रिया देताना किंवा जनसभेला संबोधित करताना वारंवार आम्ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. आमच्याबरोबरचे सगळे खरे शिवसैनिक असल्याचं सांगत आमदार-खासदारांचा आकडाही वारंवार सांगत आहेत. हाच धागा पकडून केदार दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे, आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे, बाळासाहेबांचीच निशाणी गोठवायला निघाले आहेत, अशा शब्दात केदार दिघे यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.